श्रीक्षेत्र चिंचवड मंदिरातील दैनंदिन धार्मिक कार्यक्रम
दर्शनाच्या वेळा
मंगलमूर्ती वाडा - श्रीमंगलमूर्ती व कोठारेश्वर
दर्शनाच्या वेळा: सकाळी ५ ते रात्रो १०:०० वाजेपर्यंत
श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी संजीवन समाधी मंदिर
दर्शनाच्या वेळा: सकाळी ५ ते दुपारी १, दुपारी ४:३० ते रात्रो १० वाजेपर्यंत.
मंदिरातील दैनंदिन धार्मिक कार्यक्रम:
सकाळी: | देव उठवणे, प्रक्षालन पूजन |
सकाळी: | अभिषेक, गाणे, नैवेद्य |
दुपारी: | मध्यान्हपूजा, महानैवेद्य |
सायंकाळी: | गायन सेवा |
रात्री: | सायंपूजा, मंत्रपुष्प, धूपारती, देव झोपविणे |
मंदिरातील नैमित्तिक कार्यक्रम
१) मंदिरातील रोजच्या कार्यक्रमाशिवाय विनायकी चतुर्थी, एकादशी या दिवशी मोठी धुपारती, प्रसंगी भजन, कीर्तन, व्याख्यान, प्रवचन इत्यादी.
२) प्रत्येक संकष्टीला लघु-धूपारती आणि महाप्रसाद असतो
भाविकांसाठी मंदिरातील सोयी व व्यवस्था :
आभिषेक:
भाविकांसाठी दर चतुर्थीस देवस्थानतर्फे अभिषेक केले जातात. अभिषेकासाठी संस्थेच्या कार्यालयामधे निधी जमा करुन त्याची पावती दिली जाते. अभिषेक झाल्यावर भाविकांना पोस्टाने प्रसाद पाठवला जातो.
प्रसाद:
देवस्थानतर्फे प्रसादाचे काजू, शेंगदाणा यांचे लाडू व आंब्याचे मोदक उपलब्ध आहेत.
देणगी:
मंदिर परिसरातील चिंचवड देवस्थानच्या कार्यालयात रोख, वस्तुरूपाने अथवा धान्य स्वरूपात देणगी स्वीकारली जाते. भाविकांनी सोन्या चांदीच्या वस्तू कार्यालयात जमा करुन रीतसर पावती घेऊन जावी.
अन्नदान:
अन्नदानासाठी ज्या भविकांना विशेष देणगी देण्याची इच्छा आहे त्यांनी धान्य, वस्तू अथवा रोख रक्कम या स्वरुपात आपली देणगी संस्थानच्या कार्यालयात जमा करुन पोहोच पावती घ्यावी.