श्रीक्षेत्र चिंचवड परिसरातील स्थळे

श्रीक्षेत्र चिंचवड परिसरातील स्थळे

  • श्रीमंगलमुर्ती वाड्याजवळ पुरातन श्रीधनेश्वर मंदिर आहे.
  • श्रीमंगलमुर्ती वाड्याजवळ क्रांतिकारक चाफेकर बंधूंचा वाडा पाहायला मिळतो.
  • श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी यांच्या संजीवन समाधी मंदिराशेजारी जिजाऊ उद्यान नावाची बाग आहे.
  • चिंचवडपासून जवळच २३ किलोमीटर अंतरावर आळंदी येथे संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराजांचे समाधीस्थान आहे.
  • १० किलोमीटर अंतरावर इंद्रायणी नदीच्या तीरावर देहू हे जगद्गुरू संत श्रीतुकाराम महाराजांचे जन्मस्थान आहे. .
  • जुन्या पुणे-मुंबई मार्गावर खोपोली येथे श्रीगगनगीरी महाराजांचा आश्रम आहे..
  • पवनानदीवर चिंचवड पासून ५४ किलोमीटर अंतरावर मोठे पवना धरण आहे.