कसे पोहचावे
श्रीक्षेत्र थेऊर देवस्थानास येण्याचे मार्ग:
पुणे: पुण्याहून येणाऱ्या भाविकांनी हडपसर गाडीतळ (सोलापूर महामार्ग) येथे यावे. तेथून थेऊर साठी साधारणपणे चाळीस मिनिटांच्या अंतराने बसेस उपलब्ध आहेत.
सोलापूर: सोलापूर कडून येणाऱ्या भाविकांनी सोलापूर महामार्गावरील उरुळीकांचन पार केल्यावर आठ कि. मी. अंतरावर थेऊर फाटा येतो. थेऊर फाट्यावरून उजवी कडे वळून थेऊर येथे यावे. हे अंतर चार कि. मी. आहे.
अहमदनगर: अहमदनगर कडून येणाऱ्या भाविकांनी लोणीकंद या गावावरून डावीकडे वळून केसनंद-कोलवडी मार्गे थेऊर येथे यावे. स्वत:चे वाहन असणाऱ्या भाविकांना हे सोयीचे ठरेल.
श्रीक्षेत्र थेऊर देवस्थान पत्र व्यवहारासाठी पत्ता:व्यवस्थापक, श्री चिंतामणी मंदिर, |