श्री क्षेत्र थेऊर येथील वार्षिक कर्यक्रम

श्रीक्षेत्र थेऊर येथील उत्सव:

वर्षभराचे धार्मिक कर्यक्रम- वर्षभरात दोन महत्त्वाचे धार्मिक कार्यक्रम होतात.

भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध चतुर्थी या चार दिवसात द्वारयात्रा निघते.
  • पहिला दिवस: पूर्वेकडे- ओझराई देवी कोरेगाव मूळ ८ कि. मी.
  • दुसरा दिवस: दक्षिणेकडे- वनराई आळंदी म्हातोबाची ७ कि. मी.
  • तिसरा दिवस: पश्चिमेकडे- मांजराई मांजरी बु॥ ७ कि. मी.
  • चौथा दिवस: उत्तरेकडे- महातरी आई (थेऊर) १ कि. मी.

माघ महिन्यात शुद्ध अष्टमीला मुख्य विश्‍वस्त श्री देव महाराज मोरगावहून निघून सायंकाळी श्रीमंगलमूर्तींसह थेऊर येथे मूक्‍कामी येतात. त्या वेळी त्यांना वाजंत्री-चौघड्‍यासह वाजत गाजत अत्यंत भक्‍तिभावाने मंदिरात आणले जाते. रात्रभर महासाधू श्रीमोरया गोसावींनी रचलेली पदे गायली जातात. दुसऱ्या दिवशी महापूजा झाल्यावर महाप्रसाद होतो. त्यानंतर श्रीमंगलमूर्तींची स्वारी श्रीक्षेत्र सिद्धटेक कडे रवाना होते.

इतर नैमित्तीक उत्सव:

दर संकष्टी व विनायकी चतुर्थीला छबिना निघतो. दरवर्षी प्रत्येक सणाला श्रीचिंतामणीला पोषाख करून आरास केली जाते.

कार्तिक वद्य अष्टमी या दिवशी रमा-माधव स्मृतिदिन साजरा केला जातो. या दिवशी पालखीमध्ये श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचा हार घातलेला फोटो ठेऊन, बँड लावून मिरवणूक नदीकाठच्या स्मारकापर्यंत जाऊन येते.