Jump to Navigation

चिंचवड महिमा

चिंचवड स्थानमहात्म्य

महान तपस्वी मोरया गोसावींमुळे अष्टविनायकापैकी मोरगावचा मोरेश्वर हा चिंचवडला आला. त्यामुळे चिंचवड या स्थानाला अलौकिक महत्व प्राप्त झाले. सद्‌गुरू मोरया गोसावींनी चिंचवडला जिवंत समाधी घेतली. सद्‌गुरू मोरया गोसावींच्या तपश्चर्येमुळे चिंचवडला अष्टविनायकां इतके महत्व प्राप्त झाले आहे. गणपतींच्या प्रमुख साडेतीन पीठांपैकी हे अर्धपीठ आहे. पूर्वी या ठिकाणी चिंचेच्या झाडांचे मोठे जंगल होते म्हणून या गावाला चिंचवाडी हे नाव पडले. पुण्यप्राप्तीच्या व उपासनेच्या दृष्टिने हे मोरगावाइतकेच श्रेष्ठ मानण्यात येते. येथे अनेक भक्‍तांना दृष्टांत झाले आहेत व अनेकांच्या मनोकामना पूर्ण झाल्या आहेत.

चिंचवड हे क्रांतीवीर चाफेकर बंधूंचे जन्मस्थान व प्रेरणास्थान आहे. चिंचवड येथे चाफेकर बंधूंचा वाडा आहे. चिंचवड ही मोठी औद्योगिक नगरी म्हणून प्रसिद्ध आहे तसेच आयटी पार्क म्हणूनही प्रसिद्ध आहे.Marathi_text | by Dr. Radut