वेदपाठशाळा

चिंचवड येथील श्रीमंगलमूर्ती वाड्‍यात गुरुकूल पद्धतीने वेदपाठशाळा चालवण्यात येते. इथे ऋग्‌वेदाचे शिक्षण दिले जाते. तसेच याज्ञिकी शिक्षण दिले जाते. त्यासाठी स्वतंत्र अध्यापक आहेत. सर्व विद्यार्थी निवासी असतात.
चिंचवड देवस्थान ट्रस्टतर्फे त्यांची राहण्याची, नाश्त्याची, जेवण्याची सोय केलेली आहे. या खेरीज त्यांना विद्यावेतन देण्यात येते.