Jump to Navigation

श्रीक्षेत्र सिद्धटेक

श्रीसिद्धिविनायकांचे मंदिर आणि मंदिर परिसर:

हे मंदिर अहिल्याबाई होळकरांनी बांधले आहे. मंदिरात आत जातांना डाव्या बाजूला शंकर, विष्णू, सूर्य, गणपती, पार्वती देवी असे शिव पंचायतन आहे. श्रींचे मंदिर उत्तराभिमुख आहे. श्री सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू आहे. गाभारा १५ फूट उंच व १० फूट रूंद आहे. सिद्धिविनायकाच्या भोवती चांदीचे मखर आहे. श्रींच्या डाव्या उजव्या बाजूला जय विजयाच्या मोठ्‍या मूर्ती आहेत. सिंहासन दगडी आहे. मधल्या गाभाऱ्यात देवाचे शेजघर आहे. सभामंडपाच्या पुढे महाद्वार आहे. त्यावर नगारखाना आहे.

श्रीसिद्धिविनायकाची मूर्ती टेकडीमध्ये स्थापलेली असल्याने सिद्धटेक मंदिरास एक किलोमीटरचा प्रदक्षिणा मार्ग आहे. या प्रदक्षिणामार्गात शंकर, शिवाईमाता, विष्णू ही मंदिरे व ग्राम दैवत येतात. मंदिराच्या बाहेर श्रीमारुती मंदिर आहे. मंदिराच्या पश्चिमेस शंकराचे व शिवाई देवीचे मंदिर आहे. या मंदिराजवळून भीमा नदी वहाते. ती या ठिकाणी दक्षिणवाहिनी झाली आहे. त्यामुळे येथे भीमेचे स्नान माहात्म्य मोठे आहे. जवळच काळभैरवाचे स्थान आहे. हा येथील राखणदार समजला जातो.

चतुर्थीच्या दिवशी दिवसभर थांबलेल्या भाविकांना देवांची तीन रुपे बघण्यास मिळतात.
मा. व्यवस्थापक

   (मोरगांव, थेऊर, सिध्दटेक, चिंचवड)
   नमस्कार,

      श्री. सिध्दीविनायक मंदिर, सिध्दटेक येथे काल रोजी श्री दर्शनाचा योग आला, मंदिरातील स्वच्छता, सेवकांची सेवाभावी वृत्ती, प्रसन्न वातावरण, आवास, निवास, भोजनप्रसाद व्यवस्था इत्यादिमुळे मन प्रसन्न झाले.


पत्ता:
गि. हि. तोष्णीवाल,
अंबिकानगर, केडगांव देवी,
अ. नगर - ४१४००५.
दि. २४/१२/२०१५Marathi_text | by Dr. Radut